Manaswi

Shrikant Kulange

  • Home
  • Author: Shrikant Kulange

मन जपलं तर आयुष्य सावरतं

डॉ श्रीकांत कुलांगे सायकॉलॉजिस्ट भावनिक आणि मानसिक आरोग्य बिघडल्यावर त्याचा परिणाम माणसाच्या संपूर्ण आयुष्यावर हळूहळू, पण खोलवर होतो. भावनिक आरोग्य म्हणजे आपण आपल्या भावना किती नीट ओळखतो, व्यक्त करतो आणि सांभाळतो; तर मानसिक आरोग्य म्हणजे विचार, वागणूक आणि दैनंदिन जीवनात काम करण्याची आपली क्षमता. जर मन सतत ताण, राग, दु:ख किंवा गोंधळलेल्या भावनांनी भरलेलं असेल […]
Read More

क्षमाशीलता

डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ “ तेरा मुझसे है पहले का नाता कोई…” (आ गले लग जा मूव्ही) ही ओळ नात्यांच्या खोलपणाबद्दल बोलते. जेव्हा नातं इतकं जुडलेलं असतं, तेव्हा राग धरून ठेवणं मनाला जड जातं. क्षमा म्हणजे कधी कधी त्या नात्याच्या मुळाशी परत जाण्याचा प्रयत्न असतो. भूतकाळातील वेदना मान्य करतानाही नात्याची किंमत ओळखणं. “Forgiveness isn’t […]
Read More

मुलांवर ओरडताय का?

  मुलांवर ओरडणे किंवा शिक्षा करणे ही पद्धत आपल्या समाजात इतकी खोलवर रुजलेली आहे की अनेकांना ती “शिस्त” वाटते, हिंसा नाही. पण मानसशास्त्र आणि ब्रेन सायन्स गेल्या काही दशकांत स्पष्ट सांगत आहे की सततचा राग, अपमान किंवा शारीरिक शिक्षा मुलांच्या मेंदूवर आणि विचारक्षमतेवर थेट परिणाम करतात. अनेक पालक नेमके याच विषयावर चिंता करताना दिसतात. लहान […]
Read More

मुलं आणि पालक – संवाद

डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ मुलं पालकांवर नाराज होतात ते बहुतेक वेळा एखाद्या एकाच प्रसंगामुळे नसतं. ती नाराजी हळूहळू साचत जाते. जेव्हा मुलांच्या भावना वारंवार दुर्लक्षित होतात, त्यांच्या भीतीला किंवा संभ्रमाला गांभीर्याने घेतलं जात नाही, तेव्हा त्यांच्या मनात एक शांत दुरावा तयार होऊ लागतो. मुलांसाठी मानसिक आधार म्हणजे फक्त समस्या सोडवणं नसतं, तर त्यांच्या भावनांना […]
Read More

मानगुटीवरचं भूत…

डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ अशा अनेक केसेस समोर येतात ज्याठिकाणी भूतकाळातील घटना आपल्याला नकळत दुःखी करून जातात. भूतकाळ कधीच पूर्णपणे संपत नाही. तो आपल्या स्मरणात, शरीरात आणि भावनांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात जिवंत राहतो. आयुष्यात घडलेल्या काही घटना इतक्या खोलवर परिणाम करून जातात की त्या केवळ आठवणी राहत नाहीत, तर त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनतात. […]
Read More

कळणं आणि समजणं

©डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ आपण रोजच्या बोलण्यात अनेकदा म्हणतो, “मला कळलंय,” किंवा “मला समजलंय.” ऐकायला दोन्ही शब्द सारखे वाटतात. पण मनाच्या पातळीवर या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात. अनेक वेळा आयुष्यात अडचण येते ती याच फरकामुळे. माणसाला गोष्ट कळलेली असते, पण ती त्याच्या वागण्यात उतरलेली नसते. कळणं ही मेंदूची प्रक्रिया आहे. माहिती ऐकली, वाचली, पाहिली […]
Read More

इच्छा आणि अपेक्षांचे खेळ

©डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ माणसाचं आयुष्य म्हणजे सतत चालणारा एक आतला खेळ आहे. या खेळात दोन प्रमुख खेळाडू असतात – इच्छा आणि अपेक्षा. इच्छा आपल्याला पुढे चालायला प्रेरणा देते, तर अपेक्षा त्या प्रवासात आपण काय मिळवायचं, कसं मिळवायचं याचं चित्र रंगवते. समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा ही चित्रं वास्तवाशी जुळत नाहीत. एक तरुण मुलगा […]
Read More

वागणुकीतील बदल आणि आतली अस्वस्थता

©डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ काल आशिषच्या वागणुकीत दिसलेला बदल हा एका दिवसात घडलेला प्रकार नाही. मागील काही आठवड्यांपासून त्याच्या वागण्यात जाणवणारा फरक आणि काल जुन्या मित्रांशी जिव्हारी लागेल अशी झालेली बोलणी, हे सगळं एकत्र पाहिलं तर ते एका आतल्या मानसिक प्रक्रियेचं बाह्य रूप वाटतं. मानसशास्त्र सांगतं की, माणसाची वागणूक ही नेहमीच त्याच्या मनःस्थितीचा आरसा […]
Read More

निवड…

शब्दांची निवड चुकली की वाक्य बदलते, आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य… गूढ परंतु सत्य. मानवी जीवनात शब्द आणि माणसं या दोन्ही गोष्टी अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी भूमिका बजावतात. शब्द हे फक्त संवादाचे साधन नसतात, ते भावनांचे वहन करणारे माध्यम असतात. आपण कोणत्या पद्धतीने बोलतो, कोणते शब्द वापरतो, यावरून समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल भावना तयार […]
Read More
Call Us Now
WhatsApp
error

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
YouTube
Instagram
WhatsApp
call us