Manaswi

भावनिक ब्लॅकमेल

© डॉ. श्रीकांत कुलांगे, सायकॉलॉजिस्ट

नवीन लग्न झालेली काही जोडपी बोलताना एक गोष्ट वारंवार सांगतात—“तो/ती मला इमोशनली ब्लॅकमेल करतो/करते.” सुरुवातीला हे थोडं मोठं शब्द वाटतं, पण नीट पाहिलं तर अशा गोष्टी आपल्या आजूबाजूलाच घडत असतात. आणि मजेशीर म्हणजे, अनेकदा आपल्यालाच कळत नाही की आपण दुसऱ्याला भावनिक पातळीवर हाताळतो आहोत.

हे सगळं फार मोठ्या गोष्टींनी होत नाही. बोलण्यातले छोटे बदल, कधी जास्त जवळीक दाखवणं, कधी अचानक थोडं दूर जाणं, कधी नकळत अपराधी वाटेल असं बोलणं… या छोट्या छोट्या गोष्टींचा दुसऱ्यावर खूप खोल परिणाम होत असतो.

प्रत्येक माणसाला प्रेम, स्वीकार आणि सुरक्षिततेची गरज असते. जेव्हा कुणीतरी या गोष्टींवर कंट्रोल ठेवायला लागतो, तेव्हा तिथे प्रॉब्लेम सुरू होतो. सुरुवातीला ते सगळं छान वाटतं—कोणीतरी आपली काळजी घेतोय, आपल्याकडे लक्ष देतोय. पण हळूहळू त्यात अटी येऊ लागतात. “तू असं केलंस तरच मी खुश”, “तू माझं ऐकलंस तरच सगळं ठीक” अशा गोष्टी नकळत सुरू होतात… आणि मग आपण स्वतःला बदलायला लागतो.

हळूहळू आत्मविश्वासावर परिणाम होतो. “मी चुकीचा आहे का?”, “माझ्यात काहीतरी कमी आहे का?” असे प्रश्न मनात फिरत राहतात. आपण स्वतःवरचा विश्वास गमवायला लागतो आणि दुसऱ्याच्या approval वर जास्त अवलंबून राहतो. इतकं की, नातं त्रासदायक असलं तरी त्यातून बाहेर पडणं कठीण वाटतं.

यात guilt आणि fear खूप मोठी भूमिका बजावतात. “मी तुझ्यासाठी इतकं केलं…” अशा वाक्यांनी आपल्यावर एक प्रकारचा दबाव येतो. मग आपण स्वतःच्या भावना बाजूला ठेवतो, फक्त नातं टिकवण्यासाठी. सतत स्वतःचं स्पष्टीकरण द्यावं लागतं, स्वतःला justify करावं लागतं… आणि आतून थकवा वाढत जातो.

अशा परिस्थितीत anxiety, stress, कधी depression सुद्धा वाढू शकतो. माणूस कायम alert राहतो—काय बोलायचं, कसं वागायचं, कुठे चूक होईल का… हा सततचा ताण मानसिक थकवा निर्माण करतो.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे—हे सगळं नेहमीच मुद्दाम केलं जातं असं नाही. काही लोक स्वतःच्या असुरक्षिततेतून, भीतीतून किंवा भूतकाळामुळे असं वागतात. पण त्यामुळे त्याचा परिणाम कमी होत नाही. ज्याच्यावर हे होतंय, त्याच्यासाठी ते तितकंच त्रासदायक असतं.

म्हणून सगळ्यात आधी गरज असते ती जाणीवेची. “माझ्यावर काय परिणाम होतोय?” हा प्रश्न स्वतःला विचारणं महत्त्वाचं. आपल्या भावना मान्य करणं, त्यांना किंमत देणं… आणि गरज वाटली तर clear boundaries ठेवणं.

शेवटी नातं हे दोघांनाही वाढायला मदत करणारं असावं, एकाला कमीपणा देणारं नाही. जर एखाद्या नात्यात आपण स्वतःला हरवत असू, तर थोडं थांबून विचार करणं गरजेचं आहे. कारण शेवटी मानसिक शांतता आणि आत्मसन्मान—हेच सगळ्यात महत्त्वाचं.

® मनस्वी सायकॉलॉजी अँड वेलनेस

7758942278

www.themanaswi.com

Leave A Comment

Call Us Now
WhatsApp
error

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
YouTube
Instagram
WhatsApp
call us