Manaswi

सवय आणि विचार – विचार बदला आचरण बदलेल,

  • Home
  • Manaswi
  • सवय आणि विचार – विचार बदला आचरण बदलेल,

विचार बदला आचरण बदलेल, हे वाक्य आपण ऐकलेले आहे. काही क्लायंटच्या म्हणण्यानुसार असं होतं नाही.
आपल्यापैकी बरेच लोक असा समज करतात की आपण जे काही करतो ते आपल्या विचारांवर आधारित असते. “मी ठरवलं तर मी करू शकतो” किंवा “मी विचार केला तर बदल घडेल” असे आपण म्हणतो. परंतु मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, आपल्या बहुतेक कृती विचारांवर नव्हे तर सवयींवर आधारित असतात.

सवयींची शक्ती अफलातून असते. मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स यांनी म्हटले आहे की “आपलं जीवन म्हणजे आपल्यातील सवयींचा एक संग्रह आहे.” म्हणजे नेमकं काय की,

1. एखादी कृती वारंवार केली की ती आपोआप घडू लागते. उदा. उठल्यावर मोबाईल पाहणे, दात घासणे, चहा घेणे.
2. जेव्हा एखादी कृती सवय बनते, तेव्हा ती करण्यासाठी जाणीवपूर्वक विचार करावा लागत नाही.
3. मेंदू ऊर्जा वाचवण्यासाठी सवयींच्या मार्गाने कार्य करतो.

इंटरेस्टिंगली, विचार विरुद्ध सवय यावर ध्यान दिले पाहिजे. थोडक्यात,

1. विचार तात्पुरते असतात आणि परिस्थितीनुसार बदलतात.
2. सवय मात्र सातत्याने घडत राहते आणि आपल्या दैनंदिन जीवनाला आकार देते. उद. “मी रोज व्यायाम करेन” असा विचार केला तरी जर व्यायामाची सवय नसेल, तर कृती होणार नाही.
3. सवयी अनेकदा शिकलेल्या प्रतिक्रिया असतात.
4. चांगल्या परिणामामुळे सवयी बळकट होतात, वाईट परिणामामुळे सवयी कमी होतात.
5. आपल्या कृतीतून चांगलं घडलं तर आपण ती सवय टिकवून ठेवतो.

याचे मानसिक परिणाम म्हणजे,

1. सकारात्मक सवयी (उदा. ध्यान, व्यायाम, वाचन) मनःशांती व आरोग्य वाढवतात.
2. नकारात्मक सवयी (उदा. विलंब करणे, नकारात्मक बोलणे, व्यसनाधीनता) मानसिक तणाव व नैराश्य वाढवतात.

बदलाची दिशा आपण ठरवायला हवी. स्वतःच्या सवयींचं निरीक्षण करणे, एकदम मोठे बदल न करता टप्प्याटप्प्याने नवी सवय लावणे, नवी सवय टिकवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहन देणे, चांगल्या सवयींना चालना देणारे लोक व प्रसंग निवडने इत्यादी.

आपल्या जीवनात विचार महत्वाचे असले तरी, प्रत्यक्षात घडणाऱ्या कृतींचं नियंत्रण सवयींकडे असतं. योग्य सवयींचा पाया घातल्यास जीवन आपोआप सकारात्मक व प्रगतिशील दिशेने जाता येते.

Leave A Comment

call us