Manaswi

Manaswi

मुलं आणि पालक – संवाद

डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ मुलं पालकांवर नाराज होतात ते बहुतेक वेळा एखाद्या एकाच प्रसंगामुळे नसतं. ती नाराजी हळूहळू साचत जाते. जेव्हा मुलांच्या भावना वारंवार दुर्लक्षित होतात, त्यांच्या भीतीला किंवा संभ्रमाला गांभीर्याने घेतलं जात नाही, तेव्हा त्यांच्या मनात एक शांत दुरावा तयार होऊ लागतो. मुलांसाठी मानसिक आधार म्हणजे फक्त समस्या सोडवणं नसतं, तर त्यांच्या भावनांना […]
Read More

मानगुटीवरचं भूत…

डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ अशा अनेक केसेस समोर येतात ज्याठिकाणी भूतकाळातील घटना आपल्याला नकळत दुःखी करून जातात. भूतकाळ कधीच पूर्णपणे संपत नाही. तो आपल्या स्मरणात, शरीरात आणि भावनांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात जिवंत राहतो. आयुष्यात घडलेल्या काही घटना इतक्या खोलवर परिणाम करून जातात की त्या केवळ आठवणी राहत नाहीत, तर त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनतात. […]
Read More

कळणं आणि समजणं

©डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ आपण रोजच्या बोलण्यात अनेकदा म्हणतो, “मला कळलंय,” किंवा “मला समजलंय.” ऐकायला दोन्ही शब्द सारखे वाटतात. पण मनाच्या पातळीवर या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात. अनेक वेळा आयुष्यात अडचण येते ती याच फरकामुळे. माणसाला गोष्ट कळलेली असते, पण ती त्याच्या वागण्यात उतरलेली नसते. कळणं ही मेंदूची प्रक्रिया आहे. माहिती ऐकली, वाचली, पाहिली […]
Read More

वागणुकीतील बदल आणि आतली अस्वस्थता

©डॉ श्रीकांत कुलांगे मानसोपचार तज्ज्ञ काल आशिषच्या वागणुकीत दिसलेला बदल हा एका दिवसात घडलेला प्रकार नाही. मागील काही आठवड्यांपासून त्याच्या वागण्यात जाणवणारा फरक आणि काल जुन्या मित्रांशी जिव्हारी लागेल अशी झालेली बोलणी, हे सगळं एकत्र पाहिलं तर ते एका आतल्या मानसिक प्रक्रियेचं बाह्य रूप वाटतं. मानसशास्त्र सांगतं की, माणसाची वागणूक ही नेहमीच त्याच्या मनःस्थितीचा आरसा […]
Read More

उदासीनता आणि मानसिक आरोग्य

कधी असं वाटतं का की “काहीच करावंसं वाटत नाही?” आवडत्या गोष्टीही आता बोअर वाटतात? कोणाशी बोलायची इच्छा होत नाही आणि मनात एक रिकामेपणा जाणवतो? हीच अवस्था म्हणजे उदासीनता — जेव्हा मन थकलं असतं आणि भावनांनी दमून गेलं असतं. उदासीनता म्हणजे आळस नाही, ही मनाची विश्रांती घेण्याची पद्धत आहे. जसं शरीराला खूप कामानंतर थोडा आराम लागतो, तसंच […]
Read More

आपला उद्देश आणि भविष्य – आपल्याला आपले उद्देश घडवतात

आपल्याला आपले उद्देश घडवतात हे मी एका कार्यशाळेत सांगितले होते. त्यानंतर अनेकांनी बऱ्याच काळानंतर भेटीनंतर याची पावती दिली. अर्थात, ही गोष्ट जगमान्य आहे की उद्देशहीन जीवन एका बेचव जेवणासारखे असते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तिमत्वाचे विकासाचे अनेक घटक आहेत, आणि त्यात आपल्या उद्देशाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजाच्या प्रभाव आणि व्यक्तिगत अनुभवानुसार माणसाचे व्यक्तिमत्व किती प्रमाणात विकसित […]
Read More

राजकीय वादविवाद आणि मानसिक आरोग्य

भारत आणि बाहेरील राष्ट्र किंवा अंतर्गत राजकारणातील होणारी उलट सुलट बयानबाजी रोज ऐकायला, वाचायला भेटते. आणि त्यातून काहीना छान वाटते, काहींचा अगदी तिळपापड होतो तर काही जाणूनबुजून शांत राहतात. राजकारण हे एक महत्वाचे सामाजिक क्षेत्र आहे ज्यामध्ये विविध विचारधारांकडे, मूल्ये, आणि आस्थांना स्थान आहे. त्याचबरोबर, राजकीय वादविवाद, जो विविध कारणांमुळे उद्भवला जातो, तो सामान्य जनतेच्या […]
Read More

मानसिक आरोग्य दिवस आणि आपण भारतीय – एक मानसशास्त्रीय दृष्टिकोन

दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी साजरा होणारा “जागतिक मानसिक आरोग्य दिवस” म्हणजे फक्त एक आरोग्य जनजागृती दिन नाही, तर माणसाच्या अंतर्मनाशी संवाद साधण्याची एक संधी आहे. “मानसिक आरोग्य” हा शब्द आपण ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ, त्यातील संवेदनशीलता आणि आपल्या भारतीय संस्कृतीशी असलेला खोल संबंध आपण अनेकदा विसरतो. मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय हो! मानसिक आरोग्य […]
Read More

हतबलता – आपल्या नात्यांना, परिस्थितीला तोंड देता देता

आपल्या नात्यांना, परिस्थितीला तोंड देता देता आयुष्य निरस वाटू लागलंय अशी भावना घेऊन अनेक क्लायंट येत असतात. जीवनात प्रत्येक व्यक्ती काही ना काही अडचणींना, अडथळ्यांना आणि तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाते. काही जण या परिस्थितीला शांतपणे तोंड देतात, तर काही जण त्यात पूर्णपणे हतबल होतात. “हतबलता” म्हणजे केवळ निराशा नाही, तर मानसिक अशक्ततेचा असा टप्पा जिथे […]
Read More

सवय आणि विचार – विचार बदला आचरण बदलेल,

विचार बदला आचरण बदलेल, हे वाक्य आपण ऐकलेले आहे. काही क्लायंटच्या म्हणण्यानुसार असं होतं नाही. आपल्यापैकी बरेच लोक असा समज करतात की आपण जे काही करतो ते आपल्या विचारांवर आधारित असते. “मी ठरवलं तर मी करू शकतो” किंवा “मी विचार केला तर बदल घडेल” असे आपण म्हणतो. परंतु मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, आपल्या बहुतेक कृती विचारांवर […]
Read More
Call Us Now
WhatsApp
error

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
YouTube
Instagram
WhatsApp
call us